Friday, April 8, 2011

देवाघरची मानसं !



देवाघरची मानसं !

पन्हाळ्याच्या बिकट प्रसंगदेखील पार पडला होता. त्यातील सैनिकांचा, सरदारांचा उत्तम मान करण्याचे महाराजांनी ठरवले. ग्जापुरच्या खिंडीत बाजी प्रभु आणि हिरडौस मावळयांनी प्रक्रमाची शर्थ केली. त्या मावळांचे पुढारी होते कृष्णाजी बंदाल देशमुख. तेव्हा महाराजांनी मनात आले की या वेळी तलवारीच्या मानाचे पहिले पान बंदाल देशमुखास द्यावे. यात हिरदोशीच्या मावळांचा थोर मान होईल. पण कान्होजीला एकदा पहिले पण दिले असता नंतर ते बंदाल देशमुखास दिले तर कान्होजी नाईक काय म्हणतील ? त्यांना राग तर नाही येणार? म्हणून योग्य वेळ येताच महाराज सहजपणे एके दिवशी कान्हीजी नाईक जेधे यांच्याशी मराठ्यांच्या झुंजीविषयी बोलता बोलता म्हणाले,
    कान्होजी नाईक, आपले बाजी प्रभु पडिले! बंद्ल्यांच्या लोकांनी अगदी प्राणांची बाजी लावून युद्धात शर्थ केली !
     वा महाराज ‌‍SS!! ते लोक तैसेच पराक्रमी, निष्ठावंत आणि शूर आहेत.
कान्होजी नाईकांनी अगदी मोकळ्या मनाने अन कौतुकाने दुजोरा दिला.
  यावर महाराज लगेच म्हणाले,
  अफझलखान मारिला ते समयी तलवारीचे पान अगोदर तुम्हाला दिले. आता ते पण अगोदर बंदलास द्यावे. त्यावरी तुम्ही ऐसी गोष्ट मान्य करणे.
  महाराज, केवळ बाजी प्रभूंच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हास आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पायापुढे आमच्या मानाची काय पत्रास ?
   राजांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. राजांनी कान्होजीला अगत्याने मिठी मारली. खोट्या मानासाठी हवी ती लाचारी पत्करण्यास मागे पुढे न पाहणारी आपण मराठी माणसे! कान्होजी नाईक, तुमच्या या कृत्याने आज तो कलंक धुऊन निघाला.
कान्होजी नाईक महाराजांची परवानगी घेऊन आंबवडयात परत आले. कान्होजी नाईकांना येथे परत येताच बरे वाटेनासे झाले. त्याचे शरीर थकले होते. त्यातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी ओळखले की आता प्रकृतीचे लक्षण काही ठीक नाही. आपली सर्व मुले एकजुटीने राहतील यांची यांना खात्री वाटत नाव्हती. म्हणून त्यांनी महाराजांना कळविले की, माझी सर्व मुळे व रोहिडेश्वरच्या खोऱ्यातील देशमुखीचे वतन आपल्या पायावर ठेविले आहे. आपण सांभाळ करावा.’ ही त्यांची निरवानिरवी होती.
   यावर महाराजांनी त्यांना योग्य ते उत्तर लिहिले. परंतु कान्होजी नाईक आजार बळावत गेला. चैत्र मासी शु.१० रोजी दुपारच्या पहारी घटका भरली आणि त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच! कान्होजींची प्राणज्योत मालवली.
           अंगद हनुमान रघुरायला!
           तैसे जेधे बंदाल शिवाजीलाSS!!!
            हा जी जी रे जी जी जी! जी!! 
   

कान्होजीराजे जेधे यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यकारण.

        
            
          कान्होजी जेधे प्रतिष्ठाण


आंबवडे. मु पो, आंबवडे                                             ता. भोर-४१२२०६


प्रती,
सर्व मित्राणो.

विषय: कान्होजीराजे जेधे यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यकारण.
विश्ववंदनीय, युगप्रवर्तक छत्रपति शिवरायांची चरणधुळ लाभलेल्या रोहिड खोरयातिल स्वामिनिष्ठ कान्होजीराजे जेधे. दरवर्षीप्रमाणे आमच्या येथे कान्होजी जेधे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम हा अंबवडे गावी कान्होजी जेधेच्या समाधीस्थळा जागी आयोजित केला जातो. कार्यक्रमास मुख्य पाहुणे खा. सुप्रिया सुळे यांची येथे उपस्तित राहणार आहेत.
कार्यक्रमा विषयी
·       *   सकाळी ९ वाजता कलक्षपुजा.
·       *  दुपारी मोफत नैत्रशिबीर आयोजित केले आहे.
·       * २ वाजता सत्यनारायणची महापुजा.
·       * ४ वाजता औरंगाबाद विद्यापीठाचे इतिहासकार डॉ. निरज सांळुखे यांचे व्याख्यान.
·        *   सायकाळी जेवण समारंभ.
·       * शिवशाहीर बाळू जगताप यांचा पोवाडयांच्या कार्यक्रम.
·       * १० वाजता कार्यक्रम समाप्ती .
हा कर्यक्रम बुधवारी, दि १३ एप्रिल,२०११ या दिवशी कान्होजीराजे जेधे समाधी स्थळावर होणार आहे. या कार्यक्रमास आपल्याला वेळ कडून यावे ही विनंती.     
                                                       आपला कृपाभिलाषी,  
                                                          बाजी जेधे          
                                                                                                                 9762226217                                           

Thursday, April 7, 2011

स्वातंत्र्यपुर्व केशवराव जेधेचे कार्य...

स्वातंत्र्यपुर्व केशवराव जेधेचे  कार्य...
ब्रम्हाणेतरांमध्येच मराठे व तत्सम जाती यांचा जसा फार मोठा भरणा होतो, तासाच संख्येने मोठ्या असलेल्या अस्पृश्यवर्गाचाही होतो. यांच्यात जागृती घडवून आणून त्यांना वरिष्ठ वर्णाच्या पायरीवर आणून पोचविण्याच्या कार्याचाही पाया महात्मा जोतिबा फुले यांनीच घातला होतो. तेच कार्य शाहू महाराजांनीही आपल्या ...संस्थानात व संस्थानबाहेरील महाराष्टात अत्यंत पोटतिडीकेने केले. हेचे कार्य अधिक व्यापक प्रमाणात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी देशभर केले. आरंभापासून राष्टीय सभेबद्दल त्यांना प्रेम होते. राष्टीय सभा म्हणजे कॉग्रेस बलवान व्हावयाची असेल तर अस्पृश्यांच्या उन्नतीचा प्रश्न विशेषतः अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न हे कॉग्रेसच्या कार्याचे एक हाती आल्यावर त्यांना या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्यांचे एक अंग बनले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. पुढे काँगेसची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती आल्यावर त्यांना या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य कर्मवीर शिंदे यांनीच केले. आणि त्याला यश येऊन कलकत्ता व नागपूर येथील अधिविशेनांत या कार्याचे एक राष्टीयकारण झाले. त्यामुळे अस्पृश्यवर्गांचा पाठिंबा कॉंग्रेसच्या कार्याला मिळाला. पुढे डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांना राष्टीय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतंत्र चळवळी सुरु झाल्यावर त्यांच्यातील आंबेडकरवादी पक्ष त्यांच्याशी फटकून वागत असला त्तरी इतर बराच मोठा अस्पृश्यवर्ग कॉंग्रेसचा अनुयायी होता, हे विसरता येत नाही. पुढेही डॉ. आंबेडकर व गांधीजी यांचा सलोख झाल्यावर हाही भेद तात्पुरता मिटून कॉंग्रेसचे बळ वाढले. त्याच काळात ब्राह्मणेतर पक्षातही बरेच चढउतार झाले. केशवराव जेधे व जवळकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या हाती त्या पक्षाची सूत्रे आली. हे कार्यकर्ते कट्टर सत्यशोधक व ब्रह्मणेतरवादी होते. पत्रके, पुस्तके, जलसे, मेळे इत्यादी प्रचाराच्या साधनांनी त्यांनी टिळक पक्षाविरुद्ध विरोधाची प्रेचंड लाट निर्माण केली. पुणे म्युनिसिपालिटीत महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा उभारण्याच्या प्रश्नावर जे वादंग माजले व त्यात फुले, शाहू छत्रपती इत्यादी त्यांचा आदर्शांचा जो अपमान झाला, ब्राह्मणेतर चळवळीला जोर चढला जेधे-जवळकर सत्यशोधाक असले तरी बद्लत्या काळात राष्टाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या आकांक्षांशी समरण होऊन कार्य करण्याकडे त्यांच्या मनोवृत्तीचा कल होता. त्याच वेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वात फरक होत होता. महात्मा गांधीच्या हातात कॉंग्रेस आली आणि नेहरुंमुळे सामजवादी विचारसरणीचा तिच्यावर प्रभाव पडू लागला. महाराष्ट्यातील कॉंग्रेस नेत्यांमुळे न.वि. गाडगीळ हे अशा समाजवादी विचारसरणीचे होते. ब्राह्मणेतरांच्या आशाआकांक्षांशी समरण होण्याची दृष्टी त्यांच्यात होती. त्यांनी जेधे-जवळकरांना जवळ करून ब्राह्मणेतर पक्षाला कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.कर्मवीर शिंदे यांच्या सहाय्याने त्यांना यात यशही आले. काळाची ओळखून जेधे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मणेतर पक्ष कॉंग्रेसमध्ये वालीन झाला. त्यामुळे तिचे बळ वाढले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक चालवळी होऊन शेवटी १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले व भारतात लोकशाही स्थापन झाली.

Tuesday, March 22, 2011

जेधे बोलला मनाला, "कैसा जाणता राजा लाभला, केवढा थोर विचार वदला! याचे तो हृदयात अंगार फुलला!...याचे तो हृदयात अंगार फुलला...!!"

अफझुल्याच्या लढ्यासमयी, अवघा मावळ एक झाला,परि त्यातून एक सर्वांतूनि आगळा राहिला,स्वराज्याचा तो गद्दार पहिला,नाव तयाचे खंडोजी खोपडा!

...म्हणे काय वाचतो हा शिवराया,मारिल यासे हा खान अफझुल्ला,परि त्याचा अंदाज चुकला,खान स्वतःच गर्दिस मिळाला!खोपडा भय खाउन पळाला,

रोष शिवरायांचा ओढावला!शरण अखेर येता जाहला,कन्होजींकरवी शब्द लाविला! (कान्होजी जेधे)(शिवरायांच्या) नजरेला नजर तो देता जाला,क्षणात खोपडा पूरता भेदरला,

राजांचा तो हुकूम सुटला,पाय डावा अन् हात उजवा (याचा) छाटावा!राजे सखोंबीतसे जेध्यांना"गद्दाराला माफी कैसी? उद्या ऐसे अनेक जन्मती,स्वराज्यासी हि किड ऐसी, आम्हास ना खपणारी!शब्द तुमचा म्हणून जिता सोडिला, नातरी छाटले असते मुंडक्याला!"

जेधे बोलला मनाला, "कैसा जाणता राजा लाभला, केवढा थोर विचार वदला! याचे तो हृदयात अंगार फुलला!...याचे तो हृदयात अंगार फुलला...!!"

----हिमांशु डबीर

अज्ञानदासानी प्रतापगड मध्ये शिवाजीराजे समोर म्हणलेला पावाडा

अज्ञानदास विनवी श्रोत्याला | राजा अवतारी जन्मला || नळ निळ सुग्रीव जांबुवंत | अंगद हनुमंत रघुनाथाला ||
एकांती भांडण | जैसे रामरावणाला ||
तैसा शिवाजी सर्जा | एकांती ना आटोपे कवणाला ||
जेधे बांदल तैसे शिवाजीला | दृष्टी परी यश शिवाजी राजाला | कलीमधी अवतार जन्मला ||

जेधे फोटो

जेधे देशमुख तर्फ रोहीड खोरे
कान्होजीराजेजेधे यांची तलवार

कान्होजीराजे जेधे यांची चिलखत

कान्होजीराजे जेधे

केशवराव जेधे