Friday, April 8, 2011

देवाघरची मानसं !



देवाघरची मानसं !

पन्हाळ्याच्या बिकट प्रसंगदेखील पार पडला होता. त्यातील सैनिकांचा, सरदारांचा उत्तम मान करण्याचे महाराजांनी ठरवले. ग्जापुरच्या खिंडीत बाजी प्रभु आणि हिरडौस मावळयांनी प्रक्रमाची शर्थ केली. त्या मावळांचे पुढारी होते कृष्णाजी बंदाल देशमुख. तेव्हा महाराजांनी मनात आले की या वेळी तलवारीच्या मानाचे पहिले पान बंदाल देशमुखास द्यावे. यात हिरदोशीच्या मावळांचा थोर मान होईल. पण कान्होजीला एकदा पहिले पण दिले असता नंतर ते बंदाल देशमुखास दिले तर कान्होजी नाईक काय म्हणतील ? त्यांना राग तर नाही येणार? म्हणून योग्य वेळ येताच महाराज सहजपणे एके दिवशी कान्हीजी नाईक जेधे यांच्याशी मराठ्यांच्या झुंजीविषयी बोलता बोलता म्हणाले,
    कान्होजी नाईक, आपले बाजी प्रभु पडिले! बंद्ल्यांच्या लोकांनी अगदी प्राणांची बाजी लावून युद्धात शर्थ केली !
     वा महाराज ‌‍SS!! ते लोक तैसेच पराक्रमी, निष्ठावंत आणि शूर आहेत.
कान्होजी नाईकांनी अगदी मोकळ्या मनाने अन कौतुकाने दुजोरा दिला.
  यावर महाराज लगेच म्हणाले,
  अफझलखान मारिला ते समयी तलवारीचे पान अगोदर तुम्हाला दिले. आता ते पण अगोदर बंदलास द्यावे. त्यावरी तुम्ही ऐसी गोष्ट मान्य करणे.
  महाराज, केवळ बाजी प्रभूंच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हास आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पायापुढे आमच्या मानाची काय पत्रास ?
   राजांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. राजांनी कान्होजीला अगत्याने मिठी मारली. खोट्या मानासाठी हवी ती लाचारी पत्करण्यास मागे पुढे न पाहणारी आपण मराठी माणसे! कान्होजी नाईक, तुमच्या या कृत्याने आज तो कलंक धुऊन निघाला.
कान्होजी नाईक महाराजांची परवानगी घेऊन आंबवडयात परत आले. कान्होजी नाईकांना येथे परत येताच बरे वाटेनासे झाले. त्याचे शरीर थकले होते. त्यातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी ओळखले की आता प्रकृतीचे लक्षण काही ठीक नाही. आपली सर्व मुले एकजुटीने राहतील यांची यांना खात्री वाटत नाव्हती. म्हणून त्यांनी महाराजांना कळविले की, माझी सर्व मुळे व रोहिडेश्वरच्या खोऱ्यातील देशमुखीचे वतन आपल्या पायावर ठेविले आहे. आपण सांभाळ करावा.’ ही त्यांची निरवानिरवी होती.
   यावर महाराजांनी त्यांना योग्य ते उत्तर लिहिले. परंतु कान्होजी नाईक आजार बळावत गेला. चैत्र मासी शु.१० रोजी दुपारच्या पहारी घटका भरली आणि त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच! कान्होजींची प्राणज्योत मालवली.
           अंगद हनुमान रघुरायला!
           तैसे जेधे बंदाल शिवाजीलाSS!!!
            हा जी जी रे जी जी जी! जी!! 
   

No comments:

Post a Comment